तलाठी भरती: नवीन पदे भरण्याबद्दल नवीन परिपत्रक जाहीर…!

Talathi Bharati 2023: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्र तलाठी 4 हजार 200 तलाठ्यांची भरती प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार असून एकट्या नाशिक विभागामध्ये 500 तलाठ्यांची भरती होणार असल्याची माहिती महसूल-मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

राज्यभरात तलाठ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते, तसेच तलाठी भरतीचे कंत्राट TCS कंपनीला देण्यात आलेले असताना सुद्धा प्रत्यक्षात तलाठी भरती केव्हा होणार याविषयी सरकारकडून केवळ घोषणाच होत असून प्रत्यक्षात तलाठी भरतीसाठीची जाहिरात अद्यापही जारी झालेली नाही. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये हजारो पदे रिक्त आहे, तर दुसरीकडे लाखो बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहे त्यातच गेल्या काही महिन्यांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे तलाठ्यांची ४००० च्यावर पदे भरण्याची नुसत्याच घोषणा करीत आहेत. या भरतीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकासुद्धा झालेल्या आहेत. परंतु, मे महिना संपत आला तरी तलाठी पदाच्या जागांसाठी काही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे, राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण नाराजी व्यक्त करत आहे. कारण की, राज्यात २०१९ पासून अद्यापही तलाठी भरती झाली नाही त्यामुळे, तलाठ्यांच्या रिक्त पडत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तलाठी भरतीची जाहिरात लवकरच जारी होणे अपेक्षित असल्याचे समजते.

शिंदे-फडणवीस सरकारतर्फे तलाठ्यांच्या पारदर्शक पदभरतीसाठी TCS आणि IBPS सारख्या विश्वासू संस्थांची निवड साल २०२२च्या शासन निर्णयाद्वारे केल्यावर आतातरी तलाठी भरतीच्या प्रक्रियेला गती येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्यापपर्यंत काहीच झाले नाही.

तरुणांचा रोष..
आयुक्त, संचालक आणि भूमी अभिलेख विभाग यांच्या अध्यक्षतेखाली TCS तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर दिनांक ४ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत माहिती अजूनही समोर येऊ शकली नाही. त्यामुळे तलाठी पदभरती संदर्भात फक्त कागदी घोडे नाचवत फक्त परिपत्रकांच्या भडिमारामुळे तरुणांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापुढे कुठलेही परिपत्रक जाहीर न करता सरळ जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी बेरोजगार उमेदवारांनी केली आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती:2023साठीच्या रिक्त पदे जिल्ह्याद्वारे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलेल्या आहेत. उमेदवार जिल्ह्यानुसार आणि विभागानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात वाचू शकतात.

नाशिक विभाग – 1035

औरंगाबाद विभाग – 847

कोकण विभाग – 731

नागपूर विभाग – 580

अमरावती विभाग – 183

पुणे विभाग -746

You might also like