पंजाबराव डख मान्सून अंदाज: 8 दिवस अगोदरच होणार मान्सूनचे आगमन; पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख…

राज्यातील शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावेळेस मान्सून बद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून अमेरिकन हवामान विभागाने दिलेल्या अल निनोच्या इशाऱ्यानंतर भारतातील सर्वच स्तरावर मान्सून बाबत वेग-वेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

याच दरम्यान शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली असून यंदा मान्सून 8 दिवस अगोदरच राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

पंजाबराव डख यांनी वर्तवला मान्सूनपूर्व हवामान अंदाज; राज्यात ‘या’ तारखेला होणार मान्सूनपूर्व पाऊस…

पंजाबराव डख यांनी 13 मे 2023 रोजी याबाबत मोठी माहिती दिली असून डख यांच्या मते यंदा अंदमान मध्य ेमान्सूनचे आगमन 22 मे 2023 च्या सुमारास होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळेस तिथे एक चक्रीवादळही तयार होणार असून चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात लवकर होण्याचा अंदाज त्यांनी बांधला आहे.

एका महिन्यापूर्वी पंजाबराव डख यांनी मान्सूनचे आगमन 8 जून 2023ला होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता पंजाबरावांनी यांनी मान्सूनचे आगमन 1 जून 2023 रोजी महाराष्ट्रात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 1 जून 2023ला महाराष्ट्रात पावसाची दमदार सुरुवात होणार असून हा पाऊस मान्सूनचाच राहणार आहे. दरम्यान 1 जून 2023 ते 3 जून 2023 दरम्यान राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच ही एक अतिशय महत्त्वाची बातमी असून मान्सूनचे वेळेपूर्वी होणारे आगमन यावेळेस सुध्दा पाऊस दमदार राहण्याचे एक प्रकारे संकेतच देत आहेत. खरीप हंगामाची पूर्वतयारी करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता ही एक दिलासा देणारी सुखद बातमी आहे.

मे महिन्यात कसं राहणार हवामान?

या मे महिन्यातील 20 मे 2023 पर्यंत तापमानात होणारी वाढ कायम राहणार असून या कालावधीत जोरदार वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांत तापमान 45 अंश डिग्री पेक्षा जास्त राहण्याची शक्यता ही पंजाबररावांनी व्यक्त केली असून 20 मे 2023 नंतर मात्र वातावरणात बदल होणार आहे, 21 मे ते 23 मे 2023 दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत भाग बदलत जोरदार पाऊस देखील पडू शकतो, असा देखील अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.

You might also like