संभाजीनगर जिल्ह्यातील 1,198 ग्रामपंचायत सदस्य अपात्र; कारण…!

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या जिल्ह्यातील तब्बल 1,198 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविले असून यात अनेक सरपंच/उपसरपंच यांचा सुद्धा समावेश आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्ड्ये यांच्या या निर्णयाची संभाजीनगर जिल्ह्यात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 617 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया 18 जानेवारी 2021 रोजी झाली होती. या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती,, अनुसूचित जमाती,, भटक्या जाती,, भटक्या विमुक्त जमाती,, इतर मागासवर्गीय बरोबरच विशेष मागास प्रवर्गातील राखीव जागेवर निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना त्यांची जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर करणे आवश्यक असते.

मात्र, त्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 198 ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंचसह सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आणि अनेक ठिकाणी सत्तासमीकरण बदलण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली असल्यामुळे जिल्ह्यातील मंत्र्यांसह खासदार, आमदारांनी फोन करून निर्णय मागे घ्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव तंत्र सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

कोणत्या तालुक्यात किती जण अपात्र ?

औरंगाबाद : 118, पैठण : 469, फुलंब्री : 54, सिल्लोड : 197, सोयगाव: 36, कन्नड: 50, खुलताबाद : 20, वैजापूर : 150, गंगापूर : 104

जिल्ह्यातील संपूर्ण यादी पाहण्यासाठी

You might also like