…तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे तर औरंगाबादच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

केंद्र सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगरला मंजूरी दिल्यावर बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या नावाचा वापर सुरु झाला आहे. मात्र, संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पुढील आदेशापर्यंत औरंगाबाद हेच नाव वापरण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयाने पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत महसूल आणि इतर विभागाशी जोडलेल्या कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल करू नये असे आदेश दिल्यानंतर न्यायालयाच्या त्या निकालाची प्रत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. या निकालाच्या प्रतीच्या अनुषंगाने महसूल विभागाबरोबर निगडित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल करू नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती, नामांतराबद्दल प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असतानाच महसूल आणि इतर विभागाशी संबंधित कार्यालयाच्या नावांत बदल केले जात असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागाशी संबंधित कोणत्याच कार्यालयाच्या औरंगाबाद नावात बदल करू नये या आदेशाची प्रत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून या आदेशानुसार जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सर्व विभागाच्या नावात बदल न करण्याचे आदेश दिले आहेत.

याबरोबरच मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. 20 एप्रिल 2023 रोजीच्या आदेशाची प्रत जोडण्यात आली आहे. शिवाय या आदेशातील सुचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागाशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद या नावात बदल करू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. याबरोबरच हा आदेश सरकारी कार्यालयाने नाव बदलू नये इथंपर्यंतच मर्यादित असल्याच्या म्हटले आहे.

जिल्ह्याधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आदेश दिल्यामुळे महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयांना “छत्रपती संभाजीनगर” हे नाव वापरता येणार नसून औरंगाबाद हेच नाव ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, मा. न्यायालयाच्या या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश सर्व कार्यालयप्रमुख आणि विभागप्रमुखांना दिले आहेत.

You might also like