ब्रेकिंग न्यूज! महाराष्ट्रात तलाठी पदासाठी 4,625 जागांची मेगाभरती करण्याचे सरकारने काढले आदेश…
Maharashtra Talathi Bharati 2023 : मागील कित्येक दिवसांपासून रखडलेल्या तलाठी पदाची मेगाभरती करण्याचे अखेर सरकरातर्फे जाहीर करण्यात आले असून राज्यात तब्बल 4 हजार 625 तलाठी पदासाठी मेगाभरती करण्यात येणार असून सरकारने याबाबतचे आदेश सुद्धा काढले आहेत. 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महसूल आणि वन विभागाकडून आदेश जारी करण्यात आला असून, त्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातंर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4,625 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकराने काढलेल्या या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन केले असून सदरील जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. शिवाय सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे. बरोबरच पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासन संबंधित विभागांच्या सूचनेप्रमाणे कमी-जास्त बदल होण्याची शक्यता असल्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा/सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सूचनांच्या आधारे परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार बनवण्यात येईल
जाहीर केलेली तलाठी भरतीची प्रक्रिया राज्यस्तरावर राबवली जात असली तरी सुद्धा तलाठी संवर्गाची यादी तयार करत असताना ज्या-त्या जिल्ह्यामध्ये रिक्त पदांचा विचार करुन त्या – त्या जिल्ह्याची स्वतंत्रपणे प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. पात्र उमेदवाराला मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्यासाठीच विचारात घेण्यात येणार आहे. तसेच त्याचा अन्य कोणत्याही जिल्ह्यातील निवड यादीशी कसलाच संबंध राहणार नाही. तलाठी संवर्गाकरीता नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असणार आहे, मात्र निवड झालेल्या उमेदवाराला उपविभाग नेमून देण्याचे संपूर्ण अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाच असणार आहे.
तलाठी भरती प्रारूप जाहिरात पाहण्यासाठी..