पंजाबराव डख यांचा अंदाज: यंदा दुष्काळ नाही तर मुलबक पाऊस, पंजाबरावांनी शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला

जून महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यात मान्सूनने राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लांबलेल्या पेरण्या आता होणार आहेत. यंदा पावसाचं आगमन उशीरा झालं आहे, मात्र यावेळेस पावसाचं प्रमाण कसं असेल याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वांना सतावत आहे. यादरम्यान शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे.

राज्यात यावर्षी दुष्काळ नाही, तर मुलबक पाऊस होणार असल्याचा दावा राज्यातले प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केला आहे. कालपासून राज्यात मान्सूनचे आगमन झालेलं आहे. मात्र पश्चिम दिशाकडून येणारा पाऊस स्थिरावत नाही, त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

पंजाबरावांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
यंदा पूर्वेकडून येणारा पाऊसच राज्यात स्थिरावणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे. सात इंच जमिनीत ओल तयार झाल्यावरच पेरणी मारण्याचा सल्ला सुद्धा पंजाबराव डख यांनी दिला आहे.

पावसाची सद्यस्थिती
पालघर, ठाणे आणि मुंबईत दिनांक २५ ते २८ जून २०२३पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २५ ते २८ जून २०२३ पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नंदुरबार आणि डहाणू या शहरांत तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. येथे पुढचे ५ दिवस ग्रीन अलर्ट जारी केलाय.

छ. संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची हजेरी..
संपूर्ण जून महिन्यात लपून बसलेल्या पावसाने शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस छ. संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कमी-अधिक प्रमाणत हजेरी लावली आहे. तर काही भागात तुरळक पावसाच्या सरी पडल्या आहे. ज्यात शनिवारी छ. संभाजीनगर शहरात किरकोळ स्वरूपात तर ग्रामीण मध्यम स्वरूपात पाऊस पडला. तर आज सुद्धा अनेक जिल्ह्यातील भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परंतु असे असले तरीही शेतकऱ्यांना दमदार पावसाची आस लागली आहे.

You might also like