पंजाबराव डख यांचा तातडीचा संदेश; उद्या 10 मे रोजी राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता…
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. 10 मे रोजी कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Panjab dakh: एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. मात्र याचा राज्यातील मान्सूनवर परिणाम होऊ नये, असे शेतकऱ्यांचे मत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवकाळी पावसाचा मान्सूनच्या पावसावर परिणाम झाल्यास दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र राज्यातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात यावर्षी दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. शिवाय जसा पाऊस २०२२ मध्ये झाला तसाच पाऊस २०२३ मध्ये सुद्धा म्हणजेच चांगल्या प्रकारे पाऊस होणार आहे.
पण अशातच पंजाबराववांनी १० मे २०२३ रोजी कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यासारखा पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच पंढरपूर, अकलूज, माळशिरस, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, लातूर या भागात जोरदार पावसाची हजेरी असणार आहे. सर्वात महत्वाचे विदर्भात आणि मराठवाड्यात १० मे २०२३ पासून कोरडे हवामान राहणार आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात १६ पर्यंत तापमान चांगले वाढणार आणि १७ मे पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे..
पंजाब डख ; यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच WhatsApp Group सामील व्हा