पंजाबराव डख यांचा अंदाज! ‘या’ तारखेला मान्सून राज्यात दाखल होणार..

राज्यातले प्रसिद्ध अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी मान्सूनबद्दल मोठे विधान केले असून येत्या ८ जून २०२३ ला राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

यंदा मान्सूनचा पाऊस हा पूर्वेकडून येणार असल्याने तो वेळेतच म्हणजेच ८ जूनलाच महाराष्ट्रात सक्रिय होईल, आणि १२ ते १७ जूनपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढेल तर २० जूनपर्यंत मान्सून राज्यभर सक्रिय होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. तसेच आज म्हणजे ४ जूनपासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितलं.

पुन्हा एकदा हवामान विभाग आणि पंजाबराव डख या दोघांच्या अंदाजात विसंगती पाहायला मिळत असून पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा हवामान विभागाच्या अंदाज व्यक्त करण्याच्या पद्धतीवर जोरदार टीका केली असू मी शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने अभ्यास करतो, त्यामुळे मला पावसाचे ढग दिसतात. इतरांना ते दिसत नाहीत अशी अप्रत्यक्ष टीकाच पंजाबराव डख यांनी हवामान विभागावर केली आहे. शिवाय, पावसाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी राज्यातील व देशातील सर्व हवामान संस्थानी एकत्रितपणे अभ्यास करण्याची नितांत गरज असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

हा आहे हवामान विभागाचा अंदाज.
L NINOच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या या अंदाजामुळे राज्यातल्या बळीराजाची चिंता वाढली असतानाच दुसरीकडे मात्र पंजाबराव डख यांनी येत्या ८ जून २०२३ लाच महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल असं स्पष्ट केले आहे. आणि डख यांचा अंदाज म्हणजे काळ्या दगडावरील पांढरी रेष असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना कित्येकदा आला आहे.

You might also like