NHM ch. Sambhajinagar Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान छ. संभाजीनगर अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन; 60 हजारापर्यंत मिळणार पगार….

१५ वित्त आयोगातंर्गत जिल्हा परिषद, छ. संभाजीनगर स्तरावरील MO-MBBS (वैद्यकीय अधिकारी) पदासाठी कंत्राटी तत्वावर सेवा थेट मुलाखतीव्दारे उपलब्ध करायची असल्यामुळे निम्न सेवांसाठी इच्छुक उमेदवारांनी निम्न उल्लेखीत सेवांसाठी परिपुर्ण भरलेल्या अर्जासहित शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती, डीडी व मुळ अर्जासह दिनांक २८/०४/२०२३ रोजी वेरुळ (Ellora) सभागृह, जिल्हा परिषद छ. संभाजीनगर येथे उपस्थित राहावे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस MBBS
????नोकरी ठिकाण – छ. संभाजीनगर

????वयोमर्यादा
• खुला प्रवर्ग – 38 वर्षे
• मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे
• वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

▪️अर्ज शुल्क –
• खुला प्रवर्ग – रु.200/-
• मागासवर्गीय प्रवर्ग – रु.100/-
• निवड प्रक्रिया – मुलाखत

????मुलाखतीचा पत्ता – वेरुळ Ellora सभागृह, जिल्हा परिषद छ्त्रपती संभाजीनगर

????️ मुलाखतीची तारीख – 28 एप्रिल 2023

????अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

???? आवश्यक कागदपत्रं
▪️एस.एस.सी., एच. एस. सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र
▪️शाळेचा दाखला
▪️पदवी गुणपत्रीका व प्रमाणपत्र
▪️पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका
▪️अनुभव प्रमाणपत्र व प्रमाणपत्र
▪️आधार कार्ड / मतदान ओळखपत्र
▪️पासपोर्ट आकाराचे १ फोटो
▪️जातीचे प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र

कृपया सविस्तर माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.

???? PDF जाहिरात https://shorturl.at/ET078
???? अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in

????️उमेदवारांना सूचना

उमेदवाराने A4 साइज् च्या कागदावर अर्ज करायाचा असुन त्यामध्ये खालील बाबी नमूद कराव्यात .

▪️अर्जामध्ये ठळक व स्पष्ट अक्षरात स्वतःचे नांव, कंत्राटी सेवेचे नांव, कायमस्वरूपी पत्ता, मोबाईल नंबर, Email Id, जन्म-तारीख, शैक्षणीकचे सर्व तपशील जसे की, विद्यापीठाचे नांव, अभ्यासक्रमाचे नाव, संस्था, गुणांची टक्केवारी, बोर्ड उत्तीर्ण झालेले वर्ष, कामाचा अनुभव, ज्या शासकीय/निमशासकीय संस्था/रुग्णालयाचे नांव, ज्या पदावर काम केलेले आहे त्या पदाचे नांव, पदाची जबाबदारी व मानधन / वेतन, कालावधी, तसेच इतर सर्व माहिती स्पष्टपणे नमुद करावी.
▪️सर्व उमेदवारांनी अधिसूचनेत नमूद अर्ज विहित कालावधीत भरणे अत्यंत आवश्यक असून अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचुक व स्पष्टपणे भरावी. लक्षात ठेवा एकदा भरलेली माहितीत कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
▪️ अर्जा बरोबरच शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित ज्या प्रर्वगात अर्ज केले आहे, त्या प्रर्वगाचे जात प्रमाणपत्र, कामाचा अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र व धनाकर्ष व्यतिरिक्त इतर कागदपत्र जोडु नयेत.
▪️एका पदसाठी एकच अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे. एका पेक्षा जास्त पदांकरीता स्वतंत्र अर्ज भरणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक पदांकरीता अर्ज शुल्कांचा स्वतंत्र धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे.

You might also like