तलाठी भरती केव्हा होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती….

Mahsul Vibhag Bharti : महाराष्ट्राच्या महसूल विभागामध्ये तब्बल 13 हजार 536 रिक्त पदांची जागा असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांचा देखील कामाचा खोळंबा होत आहे, त्यातही सर्वाधिक पदे तलाठ्याची रिक्त असून 4 हजार 122 तलाठ्यांच्या पदाकरिता दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी पत्र काढून सुद्धा अद्याप भरती घेण्यात आली नाही. आता महसूल विभागातली 13 हजार 536 पदे एकदाच भरण्यात येणार असून त्यात तलाठी संवर्गाची 5 हजार 30 पदे रिक्त असून 4 हजार 122 पदांच्या भरतीचे नियोजन केले आहे..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोणत्या पदांचे किती पदे रिक्त?
• तलाठी – ५०३० पदे
• अपर जिल्हाधिकारी – 31 पदे
• उपजिल्हाधिकारी – 16 पदे
• तहसीलदार – 66 पदे
• नायब तहसीलदार – 457 पदे
• अधीक्षक – 12
• उपअधीक्षक भूमी अभिलेख – 12
• मुद्रांक निरीक्षक – 15
• दुय्यम निरीक्षक – 182 पदे
• मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक लघुटंकलेखक – 2575 पदे
• अराजपत्रिक लघुलेखक – 153 पदे
• कनिष्ठ लिपिक – 532 पदे
• पदसमुह 4 – 1811 पदे
• शिपाई – 2375 पदे

या रिक्त पदांची जागा न भरल्यामुळे एकच अधिकाऱ्याकडे कामाचा जास्त ताण वाढल्यामुळे त्यांना सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याशिवाय तहसीलदार आणि नायब-तहसीलदार यांची 523 पदे रिक्त असून यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे जास्तीच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण वाढल्यामुळे त्यांच्याकडची कामे प्रलंबित राहत आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात संपूर्ण महसूल यंत्रणा गुंतते यामुळे प्रलंबित कामाचा बोजा वाढतो त्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो.

आता येणाऱ्या ऑगस्ट 2023 पर्यंत या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी भरतीचे नियोजन केले जाणार असून महसूल विभागातील 23 हजार जागा, ग्रामविकास विभागातील 13 हजार जागा, कृषी विभागातील 10 हजार आणि इतर विभागातील तब्बल 25 ते 30 हजार जागा असे मिळून सर्व 75000 जागा येत्या ऑगस्ट 2023 पर्यंत भरण्याचे महाराष्ट्र सरकारने योजले आहे.

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा…

Similar Posts