नोकरीच्या शोधात असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी..! लवकरच होणार 19 हजार जांगाची मेगा भरती!

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मोठी बातमी समोर आली असून राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये लवकरच 18 हजार 939 रिक्त जागांची मेगा भरती होणार असून आता जवळपास सर्वच जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होण्याचे संकेत ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेची भरती आता लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. तरी उमेदवारांनी कर्मचाऱ्यांच्या या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसांठीचा अभ्यासक्रम करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन ग्रामविकास विभागाने केले आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या भरतीसाठीची जाहिरात येणाऱ्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करणार असल्याचे संकेत ग्रामविकास विभागाने दिले आहे.

राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गट (क) मधील आरोग्य व इतर विभागातील तब्बल 18 हजार 939 पदे भरली जाणार असून त्यासाठी आयबीपीएस (IBPS) या कंपनील नियुक्त करण्यात आले असून या भरतीला जिल्हा परिषद यांनी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचे निर्देश ग्राम विकासाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी दिले आहेत.

भरली जाणारी पदे पुढील प्रमाणे

आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ लेखाधिकार, कनिष्ठ आरेखन, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, तारतंत्री, पर्यवेक्षिका पशुधन, पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, लघुटंख लेखक, लघुलेखक उच्च श्रेणी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, लघुलेखक निम्नस्त्रेणी, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, कृषी विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2 विस्तार अधिकारी, सांचीची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक..

गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या या भरतीप्रक्रियेत भरतीसाठी अर्ज मागवून सुद्धा ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बेरोजगार तरूणांमध्ये मोठी नाराजी होती. नंतर परत फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रक्रियेला प्रारंभ होणार असताना पुन्हा विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे ती लांबणीवर पडली होती. अखेर मे प्रारंभी जाहीर होणार आहे. पदभरती जाहिरातीनंतरही नियुक्त्या प्रदानपर्यंतची ही प्रक्रिया सुमारे तीन ते चार महिने चालण्याची शक्यता आहे…

You might also like