जीवन विमा का घ्यावा? जाणून घ्या फायदे, कारण Life Insurance Policy आज तुमच्यासाठी, उद्या तुमच्या कुटुंबासाठी
Life Insurance Policy : आजच्या काळात आपण सर्व कामात कितीही व्यस्त असलो, आणि कितीही पैसे कमवत असलो तरी सुद्धा उद्या काय होईल, कोण सांगू शकतं? त्यासाठी जर आपल्याला काही झालं, तर आपल्या मागे राहिलेल्या आपल्या प्रियजनांच आणि आपल्या कुटुंबाचं काय?
या सर्वांचं उत्तर एकच, ते म्हणजे – Life Insurance Policy.
Life Insurance Policy म्हणजे काय?
Life Insurance Policy म्हणजे तुमच्यासाठी आणि तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबियांना मिळणारी एका प्रकारची आर्थिक सुरक्षा कवच. समजा जर एखाद्या व्यक्तीचा अपघातात अपंगत्व किंवा मृत्यू आला तर, त्याच्या कुटुंबाला विमा कंपनी कडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी जी पॉलिसी घेतली जाते, तिलाच Life Insurance Policy किंवा जीवन विमा असे म्हणतात.
यासाठी आपण जिवंतपणी त्यासाठी प्रीमियम भरतो आणि आपल्याला काहीही झाल्यास, आपल्या कुटुंबाला एक ठराविक रक्कम मिळते.
का घ्यावा Life Insurance?
“पैसे कमवणं ही प्रत्येक जबाबदारी असते; पैसे कमल्यामुळेच आपले घर चालते, मुलांचे शिक्षण होते, बायका पोरांची हौस मौज पूर्ण तर होते. पण या शिवाय त्यांचं भवितव्य सुद्धा सुरक्षित करणं ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते.” कारणं आपल्यानंतर आपल्या
- कुटुंबाला आर्थिक आधार मिळवा
- मुलांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध व्हावा
- घरखरेदीसाठी मदत व्हावी
- त्यांना कर्जाचे हप्ते फेडता यावे यासाठी प्रत्यकाने Life Insurance Policy घेतलीच पाहिजे
Life Insurance चे मुख्य चार प्रकार असतात
1. Term Insurance : म्हणजे फक्त मृत्यूनंतर आपल्या आर्थिक मदत म्हणून एक ठराविक रक्कम मिळते. Term Insurance मध्ये प्रीमियम कमी आणि कव्हरेज जास्त मिळतो
2. Endowment Plan : यामध्ये मृत्यूपूर्व किंवा विम्याचा कालावधी संपुष्टात आल्यावर दोन्ही वेळेस ठराविक रक्कम मिळते
3. ULIP : म्हणजे विम्याच्या संरक्षणाबरोबर आणि गुंतवणूक सुद्धा होते.
4. Whole Life Insurance: यामध्ये आयुष्यभर विमा कव्हर म्हणजे संरक्षण मिळतो.
किती प्रीमियम भरावा लागतो?
तुम्हाला Life Insurance Policy घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की:
- तुमचे वय
- आरोग्य
- तुमचे धूम्रपान/दारूचे सेवन करता का
- तुम्हाला हव्या असलेल्या विम्याची रक्कम म्हणजेच Sum Assured)
- आणि Policy चा कालावधी
समजा : जर तुमचं वय 30 वर्ष असेल आणि तुम्हाला 1 कोटी रुपयांचा टर्म प्लॅन हवा असेल, तर तुम्हाला दर महिना 500–700 रुपये भरावे लागू शकते.
या आहे भारतातील प्रमुख विमा कंपन्या
- LIC of India
- HDFC Life
- SBI Life
- ICICI Prudential
- Max Life Insurance
Life Insurance Policy कशी घ्यावी?
आजच्या डिजिटल युगात जीवन विमा घ्यायला फारसे डॉक्युमेंट्स लागत नाहीत. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन वेबसाइट्सवरून सहज विमा घेऊ शकता. यासाठी फक्त तुमचं वय, उत्पन्न, आणि आधार कार्ड, पॅन कार्ड लागतो.
भारतातील प्रसिद्ध विमा वेबसाईट :
- PolicyBazaar
- ET Money
- InsuranceDekho
महत्त्वाचा सल्ला
- कमी वयात विमा घेतला तर प्रीमियम कमी द्यावा लागतो
- विमा घेतांना Health Checkup करणे आवश्यक असते
- कोणतीही Policy घेण्यापूर्वी त्यासंबंधी असलेल्या सगळ्या अटी नीट वाचा
- Nominee चे नाव चुकलं नाही पाहिजे, कारण तुमच्यानंतर सर्व रक्कम तुमच्या Nominee म्हणजेच वारसदाराला मिळते.
एकंदरीत Life Insurance म्हणजे फक्त एक पॉलिसी नाही, तर तुमच्या नंतर तुमचं कुटुंब सावरणारी ढाल आहे. आज घेतलेल्या निर्णयामुळे उद्या तुमचं कुटुंब सुरक्षित असेल.
विचार करा मित्रानो जर उद्या काही विपरीत घडलं, तर तुमचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल का? जर तुमचं उत्तर “नाही” असं असेल तर आजच तुमच्यासाठी योग्य असलेल्या Life Insurance policy ची निवड करा.
मित्रानो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर शेअर करा आणि इतरांनाही माहिती द्या.
