“गरीबीतून करोडपती… आणि पुन्हा कंगाल! Online Gaming Bill 2025 ने उघड केली Real Money Games ची काळी बाजू”
भारत सरकारने Online Gaming Bill 2025 पास करून Real Money Games (RMG) वर मोठा आळा घातला आहे. या Bill ला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता राष्ट्रपतींचीही सहमती मिळाल्याने हे कायदा म्हणून लागू झाले आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश Online Betting Apps आणि RMG Games मधून लोकांना होणारे आर्थिक नुकसान थांबवणे हा आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका व्यवसायाची कथा Online Gaming चा काळा चेहरा दाखवते.
गरीबीतून श्रीमंती, पण Online Gaming ने गमावले सर्व काही
अजीत त्रिपाठी (बदललेले नाव) नावाच्या व्यवसायिकाने अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर गरीबीपासून अमीरीपर्यंतचा प्रवास केला होता. पण 2021 मध्ये कोरोना काळात त्याने Online Betting App – Parimatch वर खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला तगडे रिटर्न मिळाले, इतकेच नव्हे तर त्याची जमा रक्कम ७ ते १० पट वाढल्याचे त्याला दिसले.
पण हाच लोभ त्याच्या आयुष्याचा मोठा शत्रू ठरला. पुढील ३ वर्षांत त्याने 27 कोटी रुपये या Online Gaming App मध्ये टाकले. त्यातील फक्त 15 कोटी परत मिळाले, तर तब्बल 12.22 कोटी रुपये बुडाले. एवढ्यावरच थांबले नाही, तर आज तो कोट्यवधी रुपयांच्या कर्जात बुडालेला आहे.
ED ची छापेमारी आणि मोठे उघड
अजीतने मुंबई पोलिसांकडे आणि Cyber Crime थाण्यात तक्रार केली. त्यानंतर Enforcement Directorate (ED) ने देशभर छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, कानपूर, नोएडा, सूरत, जयपूर, मदुरै आणि हैदराबाद येथे छापेमारीत 110 कोटी रुपयांची आपराधिक कमाई जप्त करण्यात आली.
तपासात उघड झाले की Parimatch हे Betting Platform सायप्रस मधून एका यूक्रेनियन नागरिकाकडून ऑपरेट केले जात होते. तसेच, हे Tax Free Curacao मध्ये Registered होते.
Online Gaming App चे काळे धंदे
ED च्या तपासात एक मोठे धक्कादायक सत्य समोर आले – फक्त एका आर्थिक वर्षात Parimatch ने भारतीय नागरिकांकडून 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.
- या Transactions साठी Mule Accounts वापरले गेले.
- हजारो Credit Cards द्वारे पैसे फिरवले जात होते.
- काही ठिकाणी ATM मार्फत कॅश काढली जात होती.
- नोएडा येथील IBlock Technologies या Crypto Trading Platform मार्फतही व्यवहार होत होते.
Online Gaming चे धोके (Side Effects of Online Gaming)
- पैशाचे मोठे नुकसान – सुरुवातीला Bonus आणि Profit चा लालूच दाखवला जातो, पण शेवटी भांडवल गमावले जाते.
- कर्जाच्या खाईत ढकलणे – लोक लोभाने मोठ्या रकमा टाकतात आणि शेवटी कर्जबाजारी होतात.
- मानसिक तणाव – सतत नुकसान झाल्याने Anxiety, Depression, Stress वाढतो.
- कौटुंबिक समस्या – घरातील बचत संपल्याने कुटुंब तुटतात.
- बनावट जाहिरातींचा सापळा – Bollywood, Cricket Stars किंवा Social Media Influencers यांच्या जाहिरातींना भुलून लोक RMG Apps मध्ये अडकतात.
सरकारचे पाऊल – Online Gaming Bill 2025
केंद्रीय IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, Real Money Games मुळे लाखो कुटुंबांची बचत संपली आणि मध्यमवर्गीयांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. म्हणूनच कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी Online Gaming Bill 2025 लागू करण्यात आला आहे.
हा कायदा लागू झाल्यानंतर आता भारतात Real Money Games (RMG) आणि Illegal Online Betting Apps वर मोठा आळा बसणार आहे. अजीत त्रिपाठी यांची कहाणी हेच दाखवते की, Online Gaming म्हणजे केवळ Entertainment नाही तर त्यात आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका दडलेला आहे.
