फक्त मोबाईल वापरून कोणाचंही live location tracking करा – ते सुद्धा एकदम फ्री!
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की फक्त मोबाईल वापरून, कोणत्याही व्यक्तीचं लाईव्ह लोकेशन (live location tracking) तुम्ही पाहू शकता – आणि ते सुद्धा 100% फ्री? होय, हे शक्य आहे आणि हे अगदी कायदेशीर देखील आहे!
Paid location tracker app पेक्षा फ्री पद्धत अधिक विश्वासार्ह!
बरेच लोक गुगल प्ले स्टोअरवर “location tracker app” सर्च करत असतात, पण त्यातले बरेचसे अॅप्स पेड असतात. काही अॅप्स ₹1000 ते ₹3000 दरमहा आकारतात. एकदा पैसे भरले की, अॅप वापरला नाही तर पैसे वाया जातात. त्यामुळे अशा paid location tracker app पासून सावध राहणे गरजेचे आहे.
मग उपाय काय? वापरा Google Map – एकदम फ्री आणि सेफ!
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं live location पाहायचं असेल आणि ती व्यक्ती तुमची ओळखीची असेल, तर Google Map चा वापर करून तुम्ही हे अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता.
कसे कराल live location tracking?
- त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये Google Map अॅप उघडा.
- वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या profile photo वर टॅप करा.
- तिथे location sharing हा पर्याय दिसेल.
- त्यात “share location” हा पर्याय निवडा.
- तुमचा mobile number किंवा Gmail account निवडा.
- त्या व्यक्तीने लोकेशन शेअर केल्यावर, ती जिथे जाईल तिथेच तीचं लोकेशन तुमच्या मोबाईलवर live दिसत राहील.
ही पद्धत कोणी वापरू शकतो?
- हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी – तुमचं लोकेशन आधीच कोणाकडे शेअर केलेलं असल्यास, मोबाईल चोरीला गेल्यावर तुम्ही ते ट्रॅक करू शकता.
- वाढती फसवणूक ओळखण्यासाठी – एखादी व्यक्ती खोटं बोलतेय का हे तपासण्यासाठी, जर लोकेशन शेअर केलेलं असेल, तर ती खरंच कुठे आहे हे समजेल.
- मुलांच्या सुरक्षिततेसाठी – मुलं उशीरापर्यंत बाहेर असतात, अशावेळी पालकांनी Google Map location sharing करून ठेवावं.
एक महत्त्वाची सूचना
ही सुविधा फक्त तेव्हाच वापरता येते जेव्हा संबंधित व्यक्ती स्वतःहून लोकेशन शेअर करण्यास तयार असते. कोणाच्याही परवानगीशिवाय त्यांचं लोकेशन पाहण्याचा प्रयत्न करणं बेकायदेशीर आहे आणि यामुळे कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात.
निष्कर्ष
जर तुम्ही सुरक्षित आणि कायदेशीर मार्गाने कोणाचंही live location tracking करायचं ठरवलं असेल, तर Google Map location sharing हा सर्वात सोपा, विनामूल्य आणि विश्वासार्ह पर्याय आहे. कोणत्याही paid location tracker app च्या झंजटीत न पडता ही पद्धत निवडा – तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचतील.
