लाडकी बहीण योजनेची e-KYC करताना या गोष्टींची काळजी घ्या नाहीतर एक चूक अन् नाव कट – Ladki Bahin e-KYC Online Process
लाडकी बहीण योजना e-KYC कशी करायची? Aadhaar OTP Verification, Husband/Father Aadhaar Link, Online Registration व Beneficiary List तपासण्याची संपूर्ण माहिती येथे वाचा.
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana Maharashtra) ही महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची शासकीय योजना आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी Ladki Bahin e-KYC Online Process पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर e-KYC योग्यरीत्या केलं नाही, तर तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं. म्हणूनच e-KYC करताना प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक करणे गरजेचं आहे.
Ladki Bahin e-KYC Online Process करण्याची Step-by-Step प्रक्रिया
- सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- तिथे दिसणाऱ्या e-KYC बॅनर वर क्लिक करा.
- आता e-KYC फॉर्म ओपन होईल. येथे तुमचा आधार कार्ड क्रमांक (Aadhaar Number) आणि कॅप्चा कोड भरा. नंतर Send OTP वर क्लिक करा.
- जर तुमचं e-KYC आधीच पूर्ण झालं असेल तर तसा संदेश दिसेल. अन्यथा, पुढील टप्प्यात आधार तपासणी होईल.
- पात्र लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव असल्यास मोबाईलवर OTP Verification येईल. तो OTP टाकून Submit करा.
- पुढील पानावर पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- विवाहित असल्यास – Husband Aadhaar Number द्या
- अविवाहित / विधवा / घटस्फोटित असल्यास – Father Aadhaar Number द्या
- आधार पडताळणीसाठी आलेला OTP टाकून Submit करा.
- आता तुमचा Caste Category (जात प्रवर्ग) निवडा आणि दोन प्रश्नांची उत्तरे होय/नाही मध्ये द्या.
- सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून Submit करा.
- यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर e-KYC Completed Successfully असा संदेश दिसेल.
Ladki Bahin e-KYC Online करताना अडचण आली तर काय कराल?
- Server Down Issue: संकेतस्थळावर एकावेळी खूप जास्त महिला लॉगिन करत असल्याने साइट स्लो होऊ शकते. त्यामुळे पहाटे किंवा रात्री उशिरा प्रयत्न करा.
- Internet Speed: मोबाईल/ब्रॉडबँड नेटवर्क मजबूत आहे का हे तपासा.
- Technical Support: समस्या सुटली नाही तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका, आशा सेविका किंवा ग्रामसेवकांशी संपर्क साधा.
महत्त्वाची सूचना : चुकीची माहिती भरल्यास तुमचं नाव Ladki Bahin Yojana Beneficiary List मधून काढले जाऊ शकते. म्हणून आधार क्रमांक, मोबाईल OTP, जात प्रवर्ग आणि कौटुंबिक माहिती अचूक भरणे अत्यावश्यक आहे.
