प्रतीक्षा संपली ! दहावीचा निकाल आज म्हणजेच २ जून दुपारी १:०० वा. होणार जारी; राज्य मंडळाने केली अधिकृत घोषणा..

SSC Result : १२वीचा निकाल जाहीर झाल्यानंत्रा १०वीचा निकाल केव्हा लागणार या बाबत पालकांबरोबरच विद्यार्थ्यांना सुद्धा प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून उद्या २ जून २०२३ रोजी १०विचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल आज दि.२ जून शुक्रवार रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची घोषणा राज्य मंडळाने केली असून पालक आणि विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

असा पाहा १०वीचा निकाल SSC Result

 • सर्वप्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in किंवा
  http://sscresult.mkcl.org किंवा https://ssc.mahresults.org.in
  वर लॉग-इन करा.
 • नंतर महाराष्ट्र SSC निकाल २०२३ या लिंकवर जा.
 • त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव लिहा.
 • त्यानंतर लॉगिन करून तुमचा १०वीचा निकाल तपासा

लक्षात ठेवा

 • निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट नंबर असणे आवश्यक असणार आहे.
 • त्यानंतर तुमचा रोल नंबर/ सीट नंबर नीट टाईप करणे आवश्यक आहे.
 • तुमच्या आईचे नाव हे इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे.
 • त्यानंतर येणारं बेसिक बेरीज/वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.
You might also like