अखेर बदलले ‘आदिपुरुष’ मधील ‘ते’ वादग्रस्त संवाद; आता चित्रपटात मारुतीराया बोलणार…

‘आदिपुरुष’ हा चित्रपट दिनांक १६ जून २०२३ ला जग भराच्या चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरीही यामधील काही संवाद व दृश्यांबद्दल सोशल मीडियावर अजूनही गदारोळ सुरुच आहे. अभिनेते अरुण गोविल आणि मुकेश खन्ना अशा दिग्गज अभिनेत्यांनी दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रेक्षकांनी सुद्धा चित्रपटातील काही संवाद बदलण्याची मागणी केली होती. यावर चित्रपटातील वादग्रस्त संवाद लवकरच काढून बदलले जातील अशी ग्वाही मनोज मुंतशीर यांनी दिली होती. त्याप्रमाणे ‘आदिपुरुष’ चित्रपटातील काही वादग्रस्त संवाद बदलून त्याजागी नवीन संवादांचा समावेश करण्यात आलेला आहे.

‘फिल्मी इन्फोर्मेशन’ने दिलेल्या बातमीनुसार ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने १२ जून २०२३ रोजी ‘आदिपुरुष’या चित्रपटाला U प्रमाणपत्र दिले होते. निर्मात्यांनी वादग्रस्त जुन्या संवादांमध्ये बदल करून ऐवजी नवीन संवाद जोडले असून हे संवाद खालील प्रमाणे आहे..

१. “तू अंदर कैसे घुसा, तू जानता भी है कौन हूं मैं” या ऐवजी “तुम अंदर कैसे घुसे, तुम जाते भी हो कौन हूँ मैं.” हा नवा संवाद जोडण्यात आला आहे.

२. चित्रपटातील सर्वात वादग्रस्त असलेला डायलॉग “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की.!” या संवादाऐवजी आता “कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की, जलेगी भी तेरी लंका ही” हा नवा डायलॉग मारुतीराया इंद्रजीतला उद्देशून बोलतील.

३. “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे” या डायलॉगऐवजी “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, हम उनकी लंका में आग लगा देंगे” असा नवीन डायलॉग असेल.

४. “मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है” या डायलॉगऐवजी “मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेषनाग को समाप्त कर दिया अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है” हा नवा डायलॉग जोडला आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणाचे रूपांतर नाही असा दावा मनोज मुंतशीर यांनी होता. यानंतर त्याच दिवशी चित्रपटातील आक्षेपार्ह ओळी बदलण्यात येतील अशी ग्वाही सुद्धा दिली होती.

Similar Posts