Loan Rule Changes: लोन घेणाऱ्यांना मिळणार स्वस्त कर्ज – CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल : आजपासून हे 4 नियम बदलले

Loan Rule Change : 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना कर्ज, क्रेडिट स्कोअर आणि नॉमिनी संदर्भात काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. हे बदलले नियम कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी एकदा हे नियम वाचा. RBI ने बँकिंग आणि कर्ज व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी हे नवे नियम जाहीर केले असून, ते 1 एप्रिल 2016 पासून लागू आहे. या सुधारणांमुळे वैयक्तिक आर्थिक नियोजन अधिक सोपे होईल आणि बँक व ग्राहकांमधील विश्वासही वाढेल.

CIBIL स्कोर दर आठवड्याला अपडेट

आतापर्यंत क्रेडिट स्कोअर महिन्यातून एकदाच अपडेट होत होता. पण आता CIBIL स्कोर दर 7 दिवसांनी अपडेट होणार आहे. म्हणजेच दर महिन्याच्या 7, 14, 21 आणि 28 तारखेला तुमचा स्कोर बदललेला दिसेल. त्यामुळे तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर तर तुमचा स्कोर लवकर सुधारेल. मात्र, हप्ते उशिरा भरल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या CIBIL स्कोर वर दिसेल.

प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर चार्जेस रद्द

नव्या नियमांनुसार, फ्लोटिंग व्याजदरावर घेतलेल्या होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि शैक्षणिक लोनवर प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर चार्ज आकारला जाणार नाही. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता कर्ज वेळेआधी फेडल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

खात्यात 4 नॉमिनी जोडण्याची सुविधा

आता बँक खाते आणि लॉकरसाठी जास्तीत जास्त 4 नॉमिनी जोडता येणार आहेत. यामुळे भविष्यात कुटुंबीयांना मालमत्ता व्यवस्थापन करणे सोपे होईल. तसेच, ज्वेलरी व्यवसायिकांसाठी गोल्ड मेटल लोन परतफेडीची मुदत 180 दिवसांवरून वाढवून 270 दिवस करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या कॅश फ्लोला मदत होणार आहे.

चांगल्या क्रेडिट स्कोअरवर स्वस्त कर्ज

आतापासून एक महत्त्वाची आणि फायद्याची गोष्ट म्हणजे जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर आता तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे योग्य वेळेत कर्ज फेडणाऱ्या ग्राहकांना अधिक फायदेशीर डील मिळू शकते.

Similar Posts